कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी मार्गदर्शन
सिटी बेल | भेंडखळ उरण |
कोरोना प्रादुर्भावाने विस्कळीत झालेले जनजीवन आताशी सावरायला लागताच ,कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे आगमन होण्याची चिन्ह दिसत आहेत, या रोगाला योग्य खबरदारी व नीट काळजी घेतली तर नक्कीच सुरक्षित राहता येईल,त्यासाठी विशेष मार्गदर्शन व जनजागृतीची गरज पाहता नेहमीच तत्पर असलेल्या भेंडखळ ग्रामपंचायतीने रविवार दि. २७ जून ला गावातील ग्रामपंचायत परिसरातील ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी गावातील विठ्ठल मंदिरात सकाळी १०ः३० वाजता डाँ . सुरज मढवी (जसखार )यांच्या द्वारे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून सुरक्षेसाठी मार्गदर्शन करून जनजागृती केली.
या वेळी ग्रामपंचायतीचे सरपंच भाग्यश्री चव्हाण ,उपसरपंच लक्ष्मण ठाकुर ग्रामपंचायत सदस्य कृष्णा ठाकुर ,रतन ठाकुर ,योगिता ठाकुर , सोनाली ठाकुर , ,निता ठाकुर ,रूचिता ठाकुर ,स्वाती घरत व निलम भोईर व निशा वशेणीकर ,दिपा माटे,हसूराम भोईर आणि निलेश्वर ठाकुर व इतर ग्रामस्थ उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली .








Be First to Comment