मा.आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या कडून उरण कोव्हीड सेंटर ला फ्लोर क्लिनर मशीन-व्हॅकुम क्लिनर आणि ५०० ऑक्सिजन मास्कचे भेट
सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |
कोरोना आजाराच्या दुसऱ्या लाटेमुळे उरण तालुक्यात व उरण शहरात अनेक नागरिक बाधित झाले असून त्यांच्यावर उरण कोविड सेंटरसह विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण “संकट गंभीर तेथे शिवसेना खंबीर” या ब्रीदवाक्या प्रमाणे मा.आमदार जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या कडून सामाजिक बांधिलकी जपत व कोविड महामारीची ची समस्या लक्षात घेऊन उरण कोविड सेंटरला फ्लोर क्लिनर मशीन-व्हॅकुम क्लिनर आणि ५०० ऑक्सिजन मास्कची भेट देण्यात आल्या. या प्रसंगी शिवसेना गटनेते गणेश शिंदे उपस्थित होते.
सदर फ्लोर क्लिनर मशीन- व्हॅकुम क्लिनर आणि ५०० ऑक्सिजन मास्क सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले, यावेळी डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.








Be First to Comment