सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी (दक्षिण विभाग) उरण येथील पत्रकार विरेश मोडखरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खांडापुरकर यांनी विरेश मोडखरकर यांना पाठविलेल्या नियुक्ती पत्रात नमूद केले आहे. यापूर्वी उरण तालुका अध्यक्ष पदाचा पदभार विरेश मोडखरकर सांभाळत होते. त्यांना बढती देत जिल्हाध्यक्ष पदाची धुरा त्यांच्यावर सोपविली आहे.
सर्वसामान्यांचे प्रश्न या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष विरेश मोडखरकर यांनी व्यक्त केला .
पत्रकार विरेश मोडखरकर यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड होताच त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.








Be First to Comment