राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेतपामुळे व कंपनीच्या मनमानी कारभारामुळे स्थानिक भूमी पुत्रांवर उपासमारीची वेळ
नागाव म्हातवली बेरोजगार संघटना बेमुदत आंदोलन करणार
सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
उरण तालुक्यात नागाव म्हातवली ग्रामपंचायत हद्दीतील ONGC कंपनीत परप्रांतीयांची भरती करण्यात येत आहे. त्यामुळे नागाव म्हातवली मधील भूमीपुत्र बेरोजगार होत आहेत.
ONGC प्रकल्पासाठी नागाव व म्हातवली मधील ग्रामस्थांनी आपल्या शेकडो पिकत्या जमिनी ONGC प्रकल्पाला दिल्या त्याबद्दल्यात ONGC प्रकल्पग्रसतांना नोकरीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रकल्प सुरु होऊन अनेक वर्षे उलटूनही स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य दिले गेले नाही. उलट येथे नोकर भरती मध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला असून तसेच कंपनीच्या मनमानी कारभारामुळे येथील स्थानिक भूमीपुत्रावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
उपजीविकेचे कोणतेच साधन उपलब्ध नसलेल्या नागाव म्हातवली मधील बेरोजगार कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली आहे. अनेकदा पत्रव्यवहार करून सुद्धा ओ एन जी सी कंपनी प्रशासन स्थानिक भूमीपुत्रांच्या मागण्याकडे लक्ष देत नसल्याने आता येथील स्थानिक भूमीपुत्र नागाव म्हातवली बेरोजगार संघटना या संघटनेच्या माध्यमातून आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन करणार आहेत.जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरु राहणार आहे.दि 28/6/2021 रोजी ओ.एन.जी.सी द्रोणागीरी भवन ए.पी.यु गेट समोर, उरण येथे सकाळी 9:30 वाजले पासुन जाहीर बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती नांगाव म्हातवली बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष वैभव कडू यांनी दिली.







Be First to Comment