Press "Enter" to skip to content

शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी झहीर कुरेशी यांची नियुक्ती

सिटी बेल | उरण | सुनिल ठाकुर |

शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी शिवसेना अल्पसंख्यांक सेलच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी झहीर कुरेशी यांची नियुक्ती केली आहे.

मनोहरशेठ भोईर यांनी श्री कुरेशी यांना शुभेच्छा देताना म्हटले आहे की, शिवसेना पक्षाच्या ध्येय-धोरणांना नुसार आपण वाटचाल करून शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी, पक्ष बांधणीसाठी आणि विस्तारासाठी प्रयत्नशील राहाल अशी खात्री बाळगतो व आपणास पुढील वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

या वेळी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, शिवसेना गटनेते गणेश शिंदे, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, तालुका उपाध्यक्ष यासीन पटेल,तालुका चिटणीस मुस्तफा सय्यद, रफिक मुल्ला, सईद पटेल, अब्दुला पटेल, मुक्तादिर पठाण, हसन अझर, युनिस खान युवा सेनेचे तिहम कुरेशी व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.