Press "Enter" to skip to content

फोटो नसलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

मा. निवडणूक आयोगाकडून मतदारांचे छायाचित्रासहित(फोटोसहित )मतदार यादी अद्ययावत करणेबाबतच्या सूचना प्राप्त झाले आहेत.190 उरण विधानसभा मतदार संघात उरण तालुक्यातील 141 मतदान केंद्रामध्ये 5151 मतदारांचे फोटो(छायाचित्र ) मतदार यादी मध्ये नाहीत.फोटो नसलेल्या मतदारांनी त्यांचे फोटो BLO कडे तात्काळ जमा करावेत. किंवा तहसील कार्यालय उरण येथे निवडणूक शाखेत 30 जून पर्यंत जमा करावेत.ज्यांचे फोटो उपलब्ध नाहीत अश्या मतदारांनी आपले फोटो जमा न केल्यास त्यांचे नाव यादीतून कमी होणार आहे.फोटो जमा न केल्यास सदर मतदार स्थलांतरित आहेत असे गृहीत धरून त्याचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार आहे.

सदर मतदारांची यादी सर्वच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांना देण्यात आलेले आहे. त्यामुळे छायाचित्र नसलेल्या मतदारांनी त्वरित आपले फोटो 30 जून पर्यंत तहसील कार्यालयात जमा करावेत असे आवाहन श्रीमती आश्विनी पाटील -मतदार नोंदणी अधिकारी -190 उरण विधानसभा मतदार संघ, भाऊसाहेब अंधारे -सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी उरण विधानसभा मतदार संघ तथा तहसीलदार उरण, श्रीमती आशा म्हात्रे निवडणूक नायब तहसीलदार उरण यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.