सिटी बेल | उरण | सुभाष कडू |
उरण तालुक्यातील अनेक वर्ष रिक्त असलेल्या 9 आंगणवाडी सेविकांची पदे भरली जाणार आहेत.त्याबाबत शासनाच्या आदेशाने एकात्मीक महिला बालकल्याण विभाग उरण ने एका नोटिशी व्दारे जाहीर केले आहे.त्याची नोटिस त्या त्या ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आली आहे
कोविड 19 काळात एक महत्वाचा सरकारी घटक म्हणून अंगणवाडी सेवीका पुढे आल्या आहेत.सगळे थांबले असताना अगदी तुटपुंज्या मानधनावर आपला अंगणवाडीचा काम करून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचून कोवीड बाबत माहिती गोळा करणे,व शासकीय योजना पुरवणे अशी कामे त्यांनी अपुर्या सुविधा असूनही जिव धोक्यात घालून केल्या.त्यामूळे शासनाचा एक वाश्वासू घटक म्हणून आंगणवाडी सेविक पुढे आल्या आहेत.त्यामूळे बरेच वर्ष रिक्त आसलेली हि पदे भरण्याचे शासनाने नोटीस काढून जाहीर केले आहे.त्यानुसार उरण मधील एकूण 9 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
त्याबाबत इच्छूक व गरजू महिलांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयासौबत वा एकात्मिक महिला बालकल्याण विभाग कार्यालय उरण येथे संपर्क करून माहिती घ्यावी आसे एकात्मिक महिला बालकल्याण विभाग उरणचे अधिकारी प्रविण पाटील यांनी सांगीतले आहे.







Be First to Comment