सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |
शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन उरण शहर शाखेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी जेष्ठ शिवसैनिक बळवंत शिरधनकर यांच्या शुभहस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार व मॉ.साहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस माजी नगरसेवक निलेश भोईर यांच्या शुभहस्ते पुष्पहार आर्पण करण्यात आला.
यावेळी जोरदार घोषणा देऊन व पेढे वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी गटनेते गणेश शिंदे, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, शहरसंपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, ग्रा.सं.कक्षाचे जिल्हाअध्यक्ष रमेश म्हात्रे, अवजड वाहतूक सेनेचे तालुकाअध्यक्ष चेतन म्हात्रे, शाखाप्रमुख अजय म्हात्रे, शाखाप्रमुख राकेश म्हात्रे, मिलिंद भोईर, गिल्बर्ट डिसोझा, युवासेनेचे योगेश गोवारी, निखिल पाटील, विलास व शिवसैनिक उपस्थित होते.








Be First to Comment