Press "Enter" to skip to content

सारडे विकास मंच तर्फे साई चरणी कौतुक सोहळा


सिटी बेल | आवरे | गुरू गावंड |

सारडे विकास मंच तर्फे अनेक सामजिक उपक्रम राबविले जातात. त्यातील एक उपक्रम म्हणजेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन होय.

सुयश क्लासेस आवरे मध्ये शैक्षणिक मार्च वर्ष 2020 मध्ये पहिला आलेला विद्यार्थी कु कर्णराज किसन म्हात्रे याचा सारडे विकास मंच तर्फे महाराष्ट्र चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यभिषेक तसबीर करण्यात आला.

सारडे विकास मंच चे रोहित पाटील व कंतीलाल म्हात्रे यांच्या हस्ते हा सत्कार आवरे येथील साई मंदिर येथे करण्यात आला.

मोजक्या साईभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सदर प्रसंगी कोरोना या महामारी चे सावट लक्षात घेता सर्व साई भक्त यांना सारडे विकास मंच तर्फे 100 मास्क चे वाटप करण्यात आले. कु कर्णराज म्हात्रे ची आई ने सांगितले की, यश मिळविण्यासाठी खूप खूप मेहनत घ्यावी लागते परंतु यशाचे पाठबळ दिल्याने खूप प्रोत्साहन मिळते. समाजात नागेंद्र म्हात्रे सर सारखे व्यक्तिमत्त्व असतील तर नक्कीच विद्यार्थ्यांना यश मिळवायची गती त्या पद्धतीने मिळेल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.