सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
वटवृक्ष सामाजिक संस्थेने उरण मधील कोविड हॉस्पिटलमध्ये विनामोबदला सेवा देणाऱ्या डॉक्टरांना कोरोना देवदूत अवार्ड २०२१ चे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या वटवृक्ष या सामाजिक संस्थेने अनेक सामाजिक उपक्रम राबवित सामाजिक कार्य करणाऱ्यांचा गौरव केला जात आहे. आज उरण मधील डीएचसी बोकडविरा येथील कोविड सेंटरमधे निशुल्कपणे कार्यरत असलेले उरण मेडीकल वेल्फेअर असोशिएशनच्या सर्व डॉक्टरांचा कोरोना देवदुत २०२१ हा सन्मानपत्र देवुन सत्कार करण्यात आला. तसेच वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या माध्यमातुन कोविड हॉस्पिटल जवळ वृक्षारोपण ही करण्यात आले.
यावेळी जेएनपीटी ट्रस्टी भूषण पाटील, मनोज पाटील, डॉ. सत्या ठाकरे, डॉ. विकास मोरे, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार आदींनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर माजी जिप सदस्य वैजनाथ ठाकूर, शेकापच्या सीमा घरत, उरण इंदिरा ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ. मनोज भद्रे, डॉ. राजेंद्र ईटकर, डॉ. सुरेश पाटील, वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
वटवृक्ष सामाजिक संस्थेमार्फत डॅा.सुरेश पाटील, डॉ. विकास मोरे, डॉ. घनःश्याम पाटील, डॉ. संजीव म्हात्रे, डॉ. सत्या ठाकरे, डॉ. सुरज मढवी, डॉ. अजय कोळी, डॉ. अविनाश तांडेल, डॉ. प्रशांत बोंद्रे, डॉ. सुरेश पाटील, डॉ. अतुल बोंद्रे, डॉ. अजय लहासे, डॉ. विशाल महाजन, डॉ. निलेश वीर, डॉ. हरिओम म्हात्रे डॉ. राजेश भावसर, डॉ. सचिन गावंड, डॉ. संतोष म्हात्रे, डॉ. सिद्धरम अरावट्टी, डॉ. वैशाली पाटील, डॉ. सुलोचना पाटील, डॉ. संजीवनी मोरे , डॉ. रानू ठाकरे, डॉ. अपर्णा साठे, डॉ. प्राजक्ता कोळी, डॉ. वैशाली दहीफळे, डॉ. रोशन पाटील, डॉ. विशाल गावंड, डॉ. समिर म्हात्रे, डॉ. प्रकाश मेहता,डॉ. कश्यर म्हात्रे, डॉ. प्राजक्ता पाटील आदींना गौरविण्यात आले.









Be First to Comment