शाळा अन विद्यार्थी
विद्यार्थी आणि शाळेच़ं तसं नातं अतूट. गेल्या वर्षी शाळा सुरु करण्याची घाई नको हा लेख लिहला, अन बऱ्याच वृत्तपत्रात छापून आला, त्या बद्धल त्या सर्व संपादकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. त्या वेळी माझ्या मनाला ती भूमिका योग्य वाटली म्हणून मत व्यक्त केलं होत़. पण कालांतराने विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता सतावू लागली.अंनत प्रश्न मनात भेडसावू लागलेत.*देशाचे भविष्य म्हणजे शाळा.येथूनच ज्ञान घेऊन विद्यार्थी भविष्य घडवितो. तेच आज टांगणीला लागलंय*. यामुळे मन अस्वस्थ झाले होते. विद्यार्थ्यांच्या भविष्याला अंधारात ढकलण्या साठी आपण पण काही अंशी कारणीभूत नाही ना असं मला माझ्या मागील लेखातील लिखाणामुळे वाटू लागले. माझं छोटं मत मी लेखामध्ये व्यक्त केलं होतं .कोणी विचारात ही घेतलं नसेल/ वाचले ही नसेल. शाळा बंद हा निर्णय अनेक तज्ञ लोकांचा, सरकार चा होता पण आपण पण त्या भूमिकेस सहभागी होतो असं विनाकारण वाटतं होतं , त्यामुळे जरा मन चिंताग्रस्त झाले होते . कित्येक दिवसांनंतर आज लिहण्याचं धाडस केलं. मध्यंतरीच्या काळात हळूहळू lockdownकमी होत गेले.पण ....शाळा काही सुरु झाल्या नाहीत. एक अर्थाने बरंच झालं,असं कधी वाटतं पण त्यातून निर्माण होणारे प्रश्न..मुलांची कोंडी, जे काही उज्वल भविष्य होते ते स्वप्न धुळीस मिळु लागलीत. असे मला आज सांगावेसे वाटते. आपल्या मातीशी असलेली नाळ एकदम तोडल्यासारखी वाटली.निसर्गाचा आनंद घ्यायला मुलेही विसरू लागली.पुढे नक्की आपण काय करायचे ही पण चिंता पालकांना भासू लागली. शाळा बंद राहुन सुद्धा देशात पन्नास हजारापेक्षा अधिक विद्यार्थी ,काही शिक्षक यांना कोरोना लागणं झालीच की.....!
पण आता सरकारनं परीक्षा रद्ध करणं सुरु केलं ,हा चिंतन विषय ठरतोय. शाळा बंद ,पण शिक्षण ऑनलाईन सुरु होतं, तशाच परीक्षा पण सुरु पाहिजे . सर्वच परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या गेल्या पाहिजे किंवा ऑफलाईन समोर घ्यायला हव्या होत्या असं वाटतं. मग त्या पहिल्या वर्गा पासून ते सर्व शैक्षणिक शिकत असलेले सारे वर्ग. माध्यमिक, उच्च माध्यमिक, विद्यापीठ, सर्वानी एकत्र येऊन सरकारपुढे प्रस्ताव ठेवायला हवा असं मला तरी वाटतं . पण तसे घडत नाही. दहावी, बारावीची परीक्षा महिना भर चालते ती दोन टप्यात घेतली असती तर दोन महिने चालली असती तसंही झालं नाही. दोन वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांची गरज लागलीअसती. आता खूप उशीर होतोय.,नव्हे झालाय.. याचे दुरगामी परिणाम होतील असं दिसतंय. एक वर्ष गेलं शाळा विना शिक्षण झालं तसं ऑनलाईन परीक्षा सुद्धा व्हायला हव्या होत्या .आज जी पहिली ते शिक्षणाच्या शेवटच्या वर्षाला असलेली सर्व पिढी यांच भविष्य काय? शिक्षका पासून ते वकील, इंजिनियर, सर्व सर्व क्षेत्राच्या शेवटच्या वर्षाला शिकत असलेली मुलं यांच आज भविष्य काय ? आजच्या राजकारण्यांना प्रश्न पडतं नाही का? हाच विषय चिंता करण्याचा झाला आहे? संकटे येतात, अन् जातात ही… पण मानव जगणं नाही विसरू शकतं…!
हल्ली नोकऱ्या पण मिळत नाहीत मिळाल्या तर त्या अत्यल्प. कधी कधी वाटते उद्योगपती सावकार यांची गुलामगिरी पदरात तर नाही पडणार आजच्या पिढीला…!??
मुळात आजच शिक्षण हेच कामगार निर्मितीवर आधारित आहे सुधारित पण तसंच. खरं तर शिक्षण मुलांनी स्वता उधोग निर्माण वर आधारित हवं पण तसं नाही अन सरकारतील उधोगपती राजकारणी घडु देणार नाहीत असंच वाटतं. जर मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिलीत तर उधोगपती अन राजकारण्यांच्या सतरंज्या, पट्टी कोण उचलतील म्हणूनच त्यांना येणाऱ्या पिढीची चिंता दिसतं नाही. त्यांना हवा तो कार्यकर्ता अन कामगार. म्हणूनच शिक्षणाचं वाटोळं बाजरीकरण स्व पोटभरण या कडे अधिक लक्ष दिसतं असं भारतातील तज्ञ लोकांचं मत आहे. या लेख माध्यमातून सांगु इच्छितो लवकरात लवकर शाळा कॉलेज टप्या टप्यान सुरु करायला लागलं पाहिजे. महामारी जे करणार ते करणारच आहे. सारे राजकीय राजकारणी लोकांचे प्रताप लोकं मेले तरी चालतील पण लोकं आमच्यासाठी गोळा झाली पाहिजेत. याच मानसिकते मुळे आज कोरोना वाढला उपाययोजना केल्या गेल्या नाहीत पाहिजे तश्या. आता तरी विध्यार्थी हितासाठी गावोगावी लसीकरण मोहीम राबवून सर्व मुलांना लस देण्यास सुरवात करून तात्काळ लस विद्यार्थी अन भारतातील जनतेला लस देऊन. सर्व पूर्ववत होण्याकडं लक्ष दया पुढाऱ्यानो. “गाव तेथे शाळा गाव तेथे दवाखाना ” याला प्राधान्य दया ‘विध्यार्थी अन शाळा’, ‘”जनता अन दवाखाना”. हे अद्यावत करा.नव्हे केली गेली पाहिजेत. जनतेनं सुद्धा गावोगाव जागृत राहुन.शिक्षण अन आरोग्य तद नंन्तर रस्ते सोई सुविधा कश्या होतील या कडे आपापल्या लोकप्रतिनिधी कडे मागणी कुठं जाब विचारून.विकास कामं करून घेतली पाहिजेत. नाहीतर आज हजार,पाच हजार देशात दिवसाला मरताय उदया कित्येक मरतील. म्हणून आजच सावध होण्याची वेळ आहे.शाळा बंद तर मुलांच शिक्षण बंद झालं ऑनलाईन पद्धत आहे पण कशी किती उपयोगी हा संशोधन विषय होईल तरी तसंच शाळेत परीक्षा हवी होती.एक वर्गात चाळीस विध्यार्थी असतील तर आज वीस उदया वीस असं बोलावून परीक्षा घेतली गेली पाहिजे होती.मी पाहतोय मुलं विसरत चाललीय शाळा एक वर्ष पासून नातं तुटलंय शाळेचे. अजून किती दिवस जातील सांगता येणार नाही. माझ्या मतां नुसार तर जसं मोबाईल, लॅपटॉप वापरात आला नाही किंवा खराब झाला तर त्यातील डाटा मेमरी कधी डिलीट करावी लागते.किंवा डिलीट होऊन जाते अगदी तसंच विध्यार्थी यांच्या मेंदू मधून शाळा शिक्षण डिलीट होतं चाललीय. सर्व नाही पण बरेच विद्यार्थी यांच ग्रामीण शेतकरी, शेतमजूर,गरीब कष्टकरी, हातावर पोट असलेली जनता यांच्या मुलांच. जेथे सर्वच सोई सुविधा वानवा तेथील विध्यार्थी यांच भविष्य अंधःकार कडे ढकललं जातंय नव्हे गेलंय ते सावरलं गेलं पाहिजे लवकरात लवकर. पाचवीच्या मुलांना कुठे पहिली पासून शिकवावं लागेल इतकी मागे गेली असतील गरिबांची मुलं भरून न येणारं नुकसान वाटतंय. काही हुशार झालीपण असतील पण खूपच कमी. जीव वाचवताना वाचलेला जीव चांगला जगला पाहिजे हे धोरण सरकारचं हवं. शाळा, शिक्षण,आरोग्य मग नंतर विकास काय म्हणतात ते. असो बरंच लिहलं गेलं थांबतो.
गेल्या महिन्या पूर्वी लिहलेला लेख प्रसिद्धी साठी पाठवण्यास राहिला होता. तरी उशिरा व्यक्त झालो त्या बद्धल क्षमस्व असावं.
प्रदीप मनोहर पाटील
मु. पोस्ट गणपूर ता चोपडा
जिल्हा. जळगाव
मोबाईल 9922239055©️®️
Be First to Comment