पद्मश्री डॉ.अनुराधा पौडवाल यांच्यातर्फे पनवेल महापालिकेस ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर
सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |
जगप्रसिद्ध गायिका पद्मश्री डॉ.अनुराधा पौडवाल यांच्या सुर्योदया फाउंडेशनतर्फे पनवेल महापालिकेस दोन ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशिन्स भेट स्वरूपात देण्यात आल्या. पालिकेच्या आरोग्य विभागाला ऑक्सिजन मशिन्स सुपूर्द करून अनुराधा पौडवाल यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
यावेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ.कविता चौतमोल, आयुक्त सुधाकर देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.आनंद गोसावी, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, सुर्योदया फाउंडेशनचे सेक्रेटरी विवेक मातोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पूनम जाधव, श्रीकांत म्हात्रे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आपत्कालीन परिस्थितीत शासनाला नेहमीच मदतीचा हात पुढे करत १९८५ पासून सुर्योदया फाउंडेशन सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून कार्यरत आहे. कोरोनाच्या महाभयंकर काळात मोठ्या प्रमाणात रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासला. त्यामुळे ऑक्सिजन अभावी असंख्य रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. ही अडचण लक्षात घेऊन सर्वोदया फाउंडेशनच्या सर्वेसर्वा तथा जगप्रसिध्द गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी वैद्यकीय उपकरणे भेट स्वरूपात दिली जात आहेत. आज ५ लिटर क्षमतेचे दोन ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर सुपूर्द करण्यात आले.








Be First to Comment