Press "Enter" to skip to content

कर्जत उपजिल्हा रुग्णालयास ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर सुपूर्द

सिटी बेल | कर्जत | जय गायकवाड |

नवी मुंबई येथील अग्रवाल दांपत्याने कर्जत उपजिल्हा रुग्णालयास 10 लिटर क्षमतेचा ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर सुपूर्द केला.

राज्यासह देशभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना च्या महामारीने रायगड जिल्ह्यात दहशत माजवली आहे, रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरज ओळखून नवी मुंबई येथील अग्रवाल दांपत्य व त्यांचे सहकारी यांनी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयास 10 लिटर क्षमतेचा ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर देण्याचा मानस कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्याकडे बोलून दाखवला. त्याप्रमाणे अग्रवाल दांपत्यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. मनोज बनसोडे यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, पुरूषोत्तम अग्रवाल, सरिता अग्रवाल, संदीप भोईर, संतोष निलधे, सुनील घरत आदी उपस्थित होते.

नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी अग्रवाल दांपत्य आणि त्यांचे सहकारी नवी मुंबई मध्ये राहतात, कोरोना महामारीत त्यांना काहीतरी मदत करायची आहे अशी इच्छा त्यांनी माझ्याजवळ व्यक्त केली आणि आपल्या ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालयासाठी केलेली मदत ही कौतुकास्पद आहे असे सांगितले.


“कोरोना महामारीच्या परिस्थिती आॅक्सिजन अभावी अनेकांने आपले प्राण गमवावे लागले आहे अनेकांकडे पैसा असून देखील वेळेत उपचार मिळाले नाहीत, त्यामुळे जीवनापेक्षा पैसा महत्वाचा नाही. आम्ही सर्वजण नोकरी करत आहोत मिळालेल्या पैशातून समाजसेवेचे व्रत हाती घेतले आहे, आम्ही कमावलेल्या पैशातून काही हिस्सा गरीब व गरजूंना मदतीचा हातभार लावणार आहोत, ही सेवा करताना आनंद होतो.”

पुरूषोत्तम अग्रवाल, समाजसेवक

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.