दोन साध्वी कर्जतच्याच असल्याने जैन समाज आंनदी
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
काही दिवसात चातुर्मास सुरू होणार आहे. या चातुर्मासाच्या कालावधीत आतापर्यँत अनेक जैन साधू येत असतात. यंदा दहा जैन साध्वी कर्जतमध्ये आल्या आहेत. त्यांचा ‘चातुर्मास प्रवेश उत्सव’ साधेपणाने करण्यात आला. यामध्ये दोन जैन साध्वी कर्जतच्या असल्याने कर्जतच्या जैन समाज बांधव – भगिनी आनंदित झाल्या आहेत.
आत्तापर्यंत चातुर्मासासाठी आलेल्या जैन साधू व साध्वींना जुन्या रेल्वे फाटकापासून मिरवणुकीने वाजत गाजत जैन मंदिरात आणत असत परंतु कोरोना महामारीच्या संकटामुळे जैन मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळूनच स्वागत करण्यास प्रारंभ केला. जैन समाजाच्या मुलांनीच वाद्य वाजवून व महिलांनी कलश प्रदक्षिणा करून स्वागत केले.
दिव्या प्रभाश्रीजी ( कर्जत ), झिना दर्शिती, मैत्री दर्शिती, उज्वला दर्शिती, जोनेश प्रिया, नैगम प्रिया, हितार्थ रुची, मोक्षार्थ रुची ( कर्जत ), वितराग रुची, लक्ष रुची या जैन साध्वी चातुर्मासासाठी आल्या आहेत.
जैन मंदिराच्या सभागृहात आचार्य भगवंत अक्षय बोधीजी महाराज यांच्या प्रवचनाचे आयोजन केले होते. त्यांनी ‘नरकवास’ या विषयावर प्रवचन केले. यावेळी जैन श्वेतांबर संस्थेचे अध्यक्ष जयंतीलाल परमार, उपाध्यक्ष दिनेश जैन, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मोहन ओसवाल, राजू ओसवाल, पंकज ओसवाल, साजन ओसवाल आदींसह जैन बांधव भगिनी उपस्थित होते.








Be First to Comment