सिटी बेल | उरण |
महाराष्ट्र नव निर्माण सेना उरण यांच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त न्हावाशेवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भट्टे तसेच उरण पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बुधवण व इतर सर्व पोलीस अधिकारी तसेच न्हावाशेवा वाहतूक शाखा आणि अवजड वाहन चालक यांना मास्क आणि सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तर या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन मनसे उरण तालुका उपाध्यक्ष मंगेश जनार्दन वाजेकर यांच्या तर्फे करण्यात आले होते.
तसेच या कार्यक्रमाला विभाग अध्यक्ष वैभव भगत, संदिप ठाकूर,तालुका उपसंघटक (रोजगार सेना) समिर म्हात्रे आणि समाधान गोंधळी हे देखील उपस्थित होते.













Be First to Comment