सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
सर्पदंशा वरील औषधे उपलब्ध व्हावीत अशी मागणी कर्जत तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली आहे.
सध्या पावसाळा सुरू झाला असून, मुसळधार पावसामुळे बिळांमध्ये पाणी शिरून साप, विंचू बाहेर येतात. अनेक वेळा ते घरात सुद्धा शिरतात.शेतीची कामे करीत असताना अनेक शेतकऱ्याना सर्पदंश होतो. काही अतिविषारी सापाने दंश केला आणि त्यावर वेळीच उपचार झाले नाहीत तर जीवावर बेतू शकते. या करिता सर्व सरकारी दवाखाने आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांवर पुरेशा प्रमाणात सर्प,विंचू दंशावरील औषधे उपलब्ध करावीत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी केली आहे.








Be First to Comment