Press "Enter" to skip to content

शाळा

शाळा

जुनी वाटते अक्षरे ती
फळ्यावरची धुळीतील
बाक ही झाले सुनेसुने
नाही कुणी दिसे चिमुकली।।१।।
किती दंगा ,किती मस्ती
होती त्या वर्गामधली
घरच्या सगळ्या गप्पा रंगती
पदर धरुनी खुर्ची भोवती ।।२।।
कविता, गाणी ,गोड गाती
उच्च स्वरे ते पाढे म्हणती
छडी बघता चूप बसती
रडवेले छोटे चेहरे दिसती ।।३।।
मैदानावर आझाद वाटे
शर्यतींना रंग चढे
कवायती ते होई संचलन
राष्ट्रीय दिनी साजरे ध्वजवंदन।४
आता मात्र गणित चुकले काळाचे
सगळ्या वेळा मागे पडल्या
नाही विज्ञान, नाही भाषा
एक वेगळाच इतिहास घडला ।।५।।
केव्हा सुरु होईल शाळा
आता मला आला कंटाळा
मित्रांसोबत मजामस्ती
शाळेचा मज लळा जिव्हाळा।६
एक वर्ष असेच गेले
पोरकी शाळा मुलांविना
भयाण शांतता नको मजला
हवा मुलांचा हल्लगुल्ला।।७।।
.जून महिना आला तरी
संपेना ही महामारी
पुढील वर्ग ,पुढचा अभ्यास
तरी मागील पाने तशीच कोरी।८
पुष्प अर्पुनी सरस्वतीला
प्रार्थना माझी शाळेला
तू बुद्धी दे ,तू तेज दे
नवचेतना विश्वास दे ।।९।।

सुषमा गोखले, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.