Press "Enter" to skip to content

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्था रक्तदान शिबिर संपन्न

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 27 जणांनी रक्तदान केले. सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्ज – खालापूर तालुक्यातील हे 431 वे रक्तदान शिबिर होते.

श्री कपालेश्वर मंदिराच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी, दिलीप गडकरी, सुहास प्रधान, संदीप रणदिवे, सुरेखा प्रधान, मिलिंद फडकर, श्वेता कुळकर्णी, सचिन परांजपे, पुंडलिक भोईर आदी उपस्थित होते.

रक्त संकलनाचे काम म संकल्प ब्लड बँक कल्याणच्या डॉ. सोनाली देसाई, राजशेखर नायर, कीर्ती सिंग, शिल्पा तोरसकर आदींनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.