Press "Enter" to skip to content

घाटकोपर येथील झायनोव्हा हॉस्पिटलसोबत शाल्बी ग्रुपची भागीदारी

जगप्रसिद्ध प्रख्यात ऑर्थो सर्जन डॉ. विक्रम शहा यांच्या हस्ते झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे उद्घाटन

सिटी बेल | मुंबई |

कोरोना संक्रमण काळामध्ये मुंबई शहरामध्ये खाजगी हॉस्पिटलचे महत्व अधोरेखित झाले असून कोरोना संक्रमण झालेल्या व इतर जीवघेणे आजार असलेल्या हजारो रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. मुंबईकरांच्या सेवेसाठी अजून एक अत्याधुनिक खाजगी हॉस्पिटल घाटकोपर पश्चिम येथे सुरु झाले आहे.

भारतामध्ये आरोग्य क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या शाल्बी हॉस्पिटल समूहाने घाटकोपर पश्चिम इथे झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल सुरु केले असून अत्याधुनिक वैद्यकीय सोयी सुविधा व उपकरणांसह रुग्ण सेवेसाठी सज्ज झालेले १५० बेडच्या या हॉस्पिटलचे उद्घाटन शाल्बी ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व जगप्रसिद्ध प्रख्यात ऑर्थो सर्जन डॉ. विक्रम शहा यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी झायनोव्हा ग्रुपचे संचालक श्री अजय हमलाई उपस्थित होते.

जागतिक प्रख्यात ऑर्थो सर्जन डॉ. विक्रम शहा यांनी पहिल्यांदाच मुंबईतील रुग्णांची पाहणी केली. झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल हे पूर्वी झायनोव्हा हॉस्पिटल या नावाने मुंबईकरांमध्ये लोकप्रिय होते व आता त्याला शाल्बी समूहाने आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाची जोड दिल्यामुळे १५० सुसज्ज बेड्चे झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल अशी नवीन ओळख झायनोव्हा हॉस्पिटलला मिळाली आहे.

झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल हॉस्पिटलची भव्यता फार मोठी आहे कारण ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल आहे. या ठिकाणी सर्व प्रकारच्या रोगांवर उपचार करणारी अत्याधुनिक यंत्रसामग्री आहे. त्यामुळे ठाणे ते कुर्ला या उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना अत्याधुनिक उपचारांसाठी मुख्य मुंबई शहरात जावे लागणार नाही. झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल येथे उपलब्ध असलेली वैदय़कीय यंत्रसामग्री ही जगातील उत्तम व अत्याधुनिक अशी यंत्रसामग्रीचा असून सर्व अद्यावत मशिनरीज येथे आहेत. हे हॉस्पिटल उभारत असताना शाल्बी समूहाने आरोग्यक्षेत्रातील अनुभवांचा वापर करून रुग्णसेवा जेवढी सुलभ करता येईल तेवढी त्याची काळजी घेतली आहे .

या रुग्णालयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार असलेली सहा ऑपरेशन थिएटर उभारलेली आहेत, यासोबतच उच्च तंत्रज्ञानयुक्त आयसीयू, आपत्कालीन विभाग, एंडोस्कोपी सुट, कॅथ लॅब, आधुनिक लॅब सुविधा , इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी उपल्बध आहे सीटी, एमआरआय, यूएसजी, मॅमोग्राम तसेच नियमित आरोग्य तपासणी सुविधा घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना त्रास होणार नाही याची योग्य ती काळजी घेतली आहे , यासोबतच रुग्णांना क्लीनिकल सुविधा देण्यासाठी १२० हुन अधिक निष्णांत डॉक्टरांची टीम हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणार आहे.

रुग्णांना उच्च दर्जाची व वाजवी दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी झायनोव्हा हॉस्पिटलने भारतातील यशस्वी कॉर्पोरेट हॉस्पिटलची साखळी असलेल्या शाल्बी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसोबत व्यवस्थापन व रुग्णसेवा हाताळण्यासाठी भागीदारी केली आहे.
आमच्या इथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दर्जेदार व उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत कळतं आमचे वैद्यकीय व बिगर वैद्यकीय कर्मचारी हॉस्पिटलमध्ये काम करीत असताना वैद्यकीय सेवेवर अतूट अभिमान बाळगतात व रुग्णांना चांगल्या प्रतीची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव तत्पर असतात अशी माहिती झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे मुख्य व्यवस्थापन अधिकारी डॉ. शिवाजी दुबे यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.