सिटी बेल । उरण । सुनिल ठाकूर ।
माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या कोव्हीड काळातील उल्लेखनीय कार्यावर प्रेरीत होवून त्यांच्या वाढदिवशी शिवसेना गटनेते गणेश शिंदे, नगरसेवक समीर मुकरी, अल्पसंख्याक सेलचे विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम, तालुका अध्यक्ष अन्वर कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण शहरातील मोहल्ला विभागातील मोईन पटेल, मुजमिल तुगेकर, झमीर भाटकर, कासम भाय, परबोलेकर, अहमद रझा, रियाज भाय, भाटकर, इब्राहिम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी प्रवेशकर्त्यांचे भगवी शाल अर्पण करून शिवसेनेत स्वागत केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, कामगार नेते महादेव घरत, मा.नगरसेवक निलेश भोईर, नगरसेविका वर्षा पाठारे, उपशहरप्रमुख गणेश पाटील, अवजड वाहतुक सेनेचे तालुका अध्यक्ष चेतन म्हात्रे, शहर युवाअधिकारी नयन भोईर, अश्फाक खान, महिला आघाडीच्या सुजाता गायकवाड,विना तनरेजा, रजिया शेख, विभाग प्रमुख संजय गावंड, डॉमनिक कोळी, उपविभागप्रमुख धिरज बुंदे, विकी म्हात्रे, शाखाप्रमुख प्रदिप शेळके, संदिप जाधव, इस्माईल शेख, रियाज मुकादम, रियाज मुल्ला व कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment