डॉ. राहुल म्हात्रे सेक्रेटरी तर डॉ.समीर नाईक खजिनदारपदी
सिटी बेल । अलिबाग । अमूलकुमार जैन ।
बालरोग तज्ज्ञ डॉ.विनायक पाटील यांची इंडियन मेडिकल असोसिएशन अलिबागच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. विनायक पाटील हे महाराष्ट्र आयएपीचे सहसचिव आणि रायगड मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत.
तसेच, डॉ.राहुल म्हात्रे अलिबागमधील अस्थीरोगतज्ञ आणि डॉ.समीर नाईक अलिबाग मधील नेत्रतज्ज्ञ यांची इंडियन मेडिकल असोसिएशन अलिबागच्या अनुक्रमे सचिव आणि कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष डॉ.राजेंद्र चांदोरकर, माजी सचिव डॉ.शेटकर आणि माजी कोषाध्यक्ष डॉ.सतीश विश्वेकर यांनी त्यांना जबाबदारी व पदभार सोपविला.
अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. विनायक पाटील यांनी अलिबागच्या नागरिकांच्या आरोग्यासाठी आपली भविष्यातील योजनां संदर्भात माहिती दिली. आयएमए अलिबाग कोविडमध्ये चांगले काम करत आहे कारण येथील सिव्हील हॉस्पिटल आणि तोडकरी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत, असे डॉ.पाटील यांनी सुचित केले.
यावेळी बोलताना डॉ. विनायक पाटील यांनी कोविड कार्य सुरू ठेवण्याची आमची योजना आहे. तसेच, अलिबागच्या लोकांना कोविड लस देणे, रिक्षाचालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरांची व्यवस्था करणे, विविध खेड्यांमध्ये आरोग्याशी संबंधित शिबीर योजना, निरोगी जीवनशैली आणि निरोगी अन्नास प्रोत्साहन देण्यासाठी रॅली आयोजित करणे अशा विविध योजना आम्ही आखणार असल्याचे सांगितले








Be First to Comment