Press "Enter" to skip to content

मोहिली प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका लोकार्पण

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

कर्जत तालुक्यातील मोहिली प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामविकास विभागामार्फत देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत रायगड जिल्हा परिषदेच्या मागणीनुसार कर्जत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मोहिली करीता नवीन रुग्णवाहिका देण्यात आली आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रुग्णवाहिका पूर्णपणे नादुरुस्त झाली असल्याने वासरे मोहिली प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येत असलेल्या बीड ग्रामपंचायत, खांडपे ग्रामपंचायत, कोंदिवडे ग्रामपंचायत, शिरसे ग्रामपंचायत, पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना कोणी आजारी पडल्यास तसेच आदिवासी महिलांना डिलिव्हरी साठी रुगवाहिका अभावी त्रास सहन करावा लागत होता. परिणामी आपल्या खाजगी वाहनात घेऊन जावे लागत असे.

राजिप उपाध्यक्ष सुधाकर शेठ घारे यांनी वारंवार जिल्हा परिषदेमध्ये पाठपुरावा करून नवीन रुग्णवाहिके साठी प्रस्ताव शासनाकडे सुपूर्द करून शासनाच्या माध्यमातून नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून घेतली. सेवेसी तत्पर सुधाकर घारे यांच्या या प्रयत्नामुळे वासरे विभागातील नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळणार असल्याने नागरिकांकडून बोलले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.