Press "Enter" to skip to content

आपटा प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका नादुरुस्त

केळवणे जिल्हा परिषद युवासेना अधिकारी स्वप्नील भोवड यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे नवीन रूग्णवाहीकेची मागणी

सिटी बेल । रसायनी ।

कोरोना प्रादुर्भाव काळात आपटा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका मोडकळीस व नादुरुस्त असल्या कारणाने परिसरातील गर्भवती स्त्रियांना तसेच येथील आदिवासी रुग्णांना व इतर समाजातील रुग्णांना अनेक वेळा खाजगी वाहन व इतर भाडेतत्त्वावर वाहनाचा वापर करावा लागतो .
केलवणे जि.प गटात 33 आदिवासी वाड्या व  20 ते 22 गावांचा समावेश होतो .चावणे पंचायत समिती व केलवणे पंचायत समिती त्यामध्ये समाविष्ट आहे .

प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी अभाव असल्याने गरोदर स्त्री ,तसेच प्रथमोपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना रात्री अपरात्री त्रास सहन करावा लागत आहे ,  सर्पदंश ,विंचूदंश झालेल्या रुग्णांना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. रुग्ण वाहिकेचा चालक वारंवार गैरहजर असल्याने रुग्णांची गैरसोय होते .

आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका नादुरुस्त असल्यानें दरवेळी 108 क्रमांकावर कॉल करून रुग्णवाहिका बोलावली जाते , त्यासाठी खूप वेळ वाया जात असल्याने रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होतो . ह्या कारणास्तव केळवणे जि. प . युवासेना अधिकारी कु.स्वप्नील सुरेश भोवड यांनी जिल्हाधिकारी रायगड , जिल्हा वैद्यकीय अधिकारी रायगड यांच्याशी पत्रव्यवहार करून नवीन रुग्णवाहिकेची मागणी केली आहे.

                     

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.