हिंदाल्को इंडस्टरीज कडून पनवेल उपजिल्हा रुग्णालयास सीएसआर फंडातून वीस ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर सहित वीस जम्बो सिलेंडर भेट
सिटी बेल । रायगड । अमूलकुमार जैन ।
पनवेल तालुक्यातील कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता ब त्यातील गंभीर रुग्णांना ऑक्सिजन लावण्यासाठी लागणारी वैद्यकीय साहित्य यांची कमतरता लक्षात घेऊन पनवेल तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयातील गरीब व गरजू रुग्णांसाठी जिल्हा धिकारी निधी चौधरी यांनी केलेल्या आव्हानास प्रतिसाद देत आदित्य बिर्ला कंपनीच्या तळोजा येथील हिंदाल्को इंडस्टरीजने सीएसआर फंडातून वीस ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर सहित वीस जम्बो सिलेंडर पनवेल तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
यावेळी हिंदाल्को इंडस्ट्रीजचे युनिट हेड सोमोजीत डॉन, युनिटचे एच आर हेड सुधीर मिश्रा,सी एस आर चे लहू रौधल, इलेक्ट्रिक विभागाचे सी.जी.जस्टीन उपस्थित होते.
तहसीलदार तळेकर यांनी सदर वैद्यकीय साहित्य हे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी तहसीलदार विजय तळेकर यांनी सांगितले की, सद्य स्थितीत देशात कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर जीवनरक्षक ठरत आहेत. त्यामुळे यामशीन्सचा तुटवडा जाणवत आहे.मात्र नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय कंपनीने घेतला पनवेल तालुक्यासहित जिल्हयात करोनाचे वाढतच चाललेल्या संक्रमणामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थापन बिघडून गेलेले आहे. अस्वस्थ रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सातत्याने प्रयत्न करीत आहे.
रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगड जिल्ह्यातील सामाजिक संस्था तसेच कंपनीना आव्हान केले होते त्या आव्हानाला प्रतिसाद देत आदित्य बिर्ला कंपनीच्या तळोजा येथील हिंदाल्को इंडस्टरीजने सीएसआर फंडातून पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयास वीस ऑक्सीजन सिलेंडर सहित ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर देत दातृत्वातुन मानवता जोपासली. रूग्ण सेवेच्या मदतीला सरसावल्याने तालुक्यात हे महत्वपूर्ण सत्कार्य आहे. याबाबत त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.








Be First to Comment