Press "Enter" to skip to content

कर्जत उपजिल्हा रुग्णालयाला श्वास मिळाला

कर्जत उपजिल्हा रुग्णालयाला आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून 3 व्हेंटिलेटर व 10 ऑक्सिजन कॉन्स्टकटेटर मशीचे वाटप

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

कोरोना महामारीत केव्हीड बाधित रुग्णांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार मिळावेत यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना यांना 5 व्हेंटिलेटर व 10 ऑक्सिजन कॉन्स्टकटेटर मशीन दिल्या आहेत तसेच टाटा पाॅवर कंपनीच्या भिवपूरी वीजकेंद्राने वैद्यकीय सुरक्षा किट दिले आहे त्याचे वाटप आज दि.29 मे रोजी आमदार महेंद्र थोरवे यांनी केले.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना 5 व्हेंटिलेटर व 10 ऑक्सिजन कॉन्स्टकटेटर मशीन दिल्या आहेत त्याच्या वाटपाचा कार्यक्रम उपजिल्हा रुग्णायात पार पडला. यावेळी व्यासपीठावर आमदार महेंद्र थोरवे, तहसिलदार विक्रम देशमुख, डॉ. आकाश गोरे, डॉ. संजीव धनेगावे, कॉग्रेस चे तालुका अध्यक्ष मुकेश सुर्वे, नगरसेवक संकेत भासे, भिवपूरी व खोपोली विभागाचे प्रमुख फुलेंद्र धुरंधर,सीएसआर मॅनेजर अतुल करवटकर, मनोहर म्हात्रे, डाॅ. गायकवाड, संतोष शिंदे आदी उपस्थित होते.

अधिक्षक डॉ. मनोज बनसोडे यांनी उपस्थित यांचे स्वागत करून प्रास्ताविकात आमदार महेंद्र थोरवे यांचे रुग्णालयाकडे जातीने लक्ष असते,कोव्हीड रुग्णालया साठी लागणारी यंत्रणा पुरवली आहे, रुग्णालया मध्ये 5 बेडची सुविधा होती आज त्यांच्यामुळे 50 बेडची सुविधा झाली आहे असे सांगून रुग्णालयात मध्ये डॉक्टरांची 4 पदे रिक्त आहेत ती भरण्याची विनंती केली. तहसीलदार विक्रम देशमुख यांनी उपजिल्हा रुग्णालयातील टीम ने महामारीत चांगले काम केले असे सांगितले.

आमदार महेंद्र थोरवे यांनी कोरोना महामारी येथील डॉक्टरांनी खूप चांगले काम केले आहे, 5 बेड चे आपण 50 बेड करू शकलो, आमदार फंडातून या विधानसभा मतदार संघात एक कोटीचा निधी दिला त्यापैकी 50 लाख कर्जत उपजिल्हा रुग्णालय साठी व उरलेला 50 लाख खालापूर- खोपोली साठी दिला असे सांगितले. कर्जत मधील नागरिकांना उपचार कर्जत मध्येच मिळावेत, त्यांना कुठेही वन वन फिरावे लागू नये म्हणून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी 5 व्हेंटिलेटर व 10 ऑक्सिजन कॉन्स्टकटेटर मशीन दिल्या आहेत, 5 व्हेंटिलेटर त्यापैकी 3 व्हेंटिलेटर व 10 ऑक्सिजन कॉन्स्टकटेटर मशीन कर्जत उपजिल्हा रुग्णालयात तर 2 व्हेंटिलेटर खालापूर-खोपोली साठी देण्यात आल्या आहेत असे सांगितले.

ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, त्या रुग्णांनी घरी थांबून उपचार न घेता उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या कडून उपचार करून घ्यावा ,डॉक्टर नर्स हे देवदूताचे काम करीत आहे, शासन व प्रशासन एकत्र येऊन महामारीचा लढा लढत आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन महामारीचे युद्ध जिंकू असे सांगितले.

सूत्रसंचालन रविंद्र माने यांनी केले.
यावेळी टाटा पाॅवर कंपनीच्या भिवपूरी वीजकेंद कंपनीतर्फे सामाजिक बांधिलकी म्हणून उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सुरक्षा साहित्य किट चे वाटप करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.