Press "Enter" to skip to content

हिंदाल्को कंपनीने दिले जिल्हा रुग्णालयास वीस जम्बो ऑक्सिजन सिलेंडर भेट

सिटी बेल । अलिबाग । अमूलकुमार जैन ।

कोव्हिडं 19 या आपत्कालीन काळात कोविड रुग्णाला उपयोगी पडावेत म्हणून आदित्य बिर्ला ग्रुपच्या तळोजा येथील हिंदाल्को वीस जम्बो ऑक्सीजन सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार त्यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकड़े सुपूर्द केले.यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सदर सिलेंडर हे जिल्हा सामान्य रुग्णालयास दिले आहे.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यलयात अलिबाग तहसीलदार सचिन सैजाळ, हिंदाल्को इंडस्ट्रीजचे सी एस आर चे लहू रौधल, आदी उपस्थित होते.

हिंदाल्को इंडस्ट्रीजचे युनिट सी एस आर चे लहू रौधल यांनी यावेळी सांगितले की, आमच्या युनिट हेड सोमोजीत डॉन, युनिटचे एच आर हेड सुधीर मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसांपूर्वी आरसीएफ येथील कोव्हिडं केअर सेंटरला वीस ऑक्सिजन काँन्स्ट्रेटर देण्यात आले होते.

त्यावेळी सांगितल्याप्रमाणे वीस जम्बो ऑक्सिजन सिलेंडर सुद्धा देण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांपासून अलिबाग तालुक्यात पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे. तो ताण कमी व्हावा हाच हेतू ठेवुन सिलेंडर देण्यात आले आहे.दिवसेंदिवस कोरोनाचे स्वरूप ग्रामीण भागात गंभीर होत असतांना ऑक्सिजन अभावी रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहे.अशा गंभीर परिस्थितीत आदित्य बिर्ला ग्रुपच्या तळोजा येथील हिंदाल्को इंडस्ट्रीजच्या सिलेंडर भेट देण्यात आले.कोरोनाच्या महामारी मध्ये गेल्या महिन्याभरात पासून रायगड जिल्हयात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवू नये हीच अपेक्षा ठेवत हिंदाल्को इंडस्ट्रीजने सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला होता.

ऑक्सिजन सिलेंडर सुपूर्द करते वेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी,अलिबाग तहसीलदार सचिन सैजाल उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार सदर ऑक्सिजन सिलेंडर हे जिल्हा रुग्णालयात देण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.