हे मृत्यंजया
हे मृत्युंजया,
तुम्ही साक्षात ज्ञानसूर्य होतात
गुलामी झुगारणारे स्वातंत्र्यवीर होतात
तुमची देशभक्ती, तुमची विजिगिषुता,
तुमची तेजस्विता नाहीच झेपली आम्हाला
तुमची धूर्त शरणागती, तुमची सागर झेप
डरपोकपणा म्हणून हिणवली आम्ही
तुमचे अखंडतेचे स्वप्न उधळून दिले
आणि भांडत बसलो भाषिक प्रांतांवर
सकल हिंदू बंधू म्हणणाऱ्या तुम्हाला
आम्ही लावून टाकले जातीचे लेबल
आणि संकुचित करून टाकला
आपल्या पुरातन संस्कृतीचा परीघ
देशाभिमान विकून टाकला आम्ही
आणि NRI व्हायची स्वप्ने पाहू लागलो
अंदमानची ट्रिप केली की धन्य झालो
बाकी स्वदेशाभिमान वगैरे विसरलो
तात्याराव, तुम्ही खूप झिजलात
रक्त आटवलेत आमच्यासाठी
पण, आम्ही कपाळकरंटे
हिरा आणि गारगोटी ओळखताच आली नाही
तात्याराव, माफी तरी कशी मागू?
तोंडात भरला आहे fast food चा तोबरा
आम्हीच आमचा लुटून दिलाय देश साजिरा
Global झालो आम्ही पुरते
विसरून देशाची आन, बान, शान
सती प्रथाच नाही आता,
तर कसे घेऊ “सतीचे वाण?”
पौर्णिमा दिक्षित, नवीन पनवेल







संदीप ची कविता “तौक्ते” खूप आवडली.
संदीप, लिहीत रहा, लिहीत रहा.
गाता गळा, लिहिता हातोळा!