नवी सकाळ
भयभीत झाले सारे
घरातच शोधी सहारे
एकाकी पणाची सल
अन मन उद्विग्न झाले ..
जाऊ कसा कुठे
तांडव मृत्यूचे जिथे तिथे
अनेक जीव तडफ़डले
श्वासच कोंडला इथे ..
जीवन इथे महाग
मृत्यू हि स्वस्त नाही
मरणाने देखील इथला
प्रश्न सुटलाच नाही ..
नाही अग्नी नाही माती
कवडीमोल जीवन झाले
मृत्यूच्या भयानक यात्रेस
पाहून भयभीत सारे झाले …
एकटाच मी इथे
सावलीही माझी नाही
जगता जगता क्षीणलो मी
पण अंधाराला थारा नाही …
येईल सकाळ एकेदिवशी
घेऊन सोनेरी स्वप्नांची झोळी
प्रतीक्षा मज त्या दिवसाची
अन ..मनास येई झळाळी
दिलीप आचार्य
कवाई
राजस्थान







Be First to Comment