चौक धारणी येथील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आसरे साठी जागा हस्तांतरीत
सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
खालापूर तालुक्यातील मौजे धारणी येथील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आसरे इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.
या पार्श्वभूमीवर मौजे धारणी ता.खालापूर येथील स.नं.15/0 क्षेत्र 3.49.00 हे.आर.पैकी 0-05-0 हे.आर. या जमीनीचे शासनाकडे पुर्नग्रहण करुन जमीन भोगाधिकार मूल्यरहित व महसूल मुक्त किंमतीने मौजे धारणी ता.खालापूर येथील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आसरे करिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.
खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही बाब महत्वाची आहे.








Be First to Comment