Press "Enter" to skip to content

प्राथमिक आरोग्य केंद्र आपटा येथील आशा सेविकांना मदतीचा हात

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

मेकिंग द डिफ्रेंन्स या संस्थेच्या माध्यमाने शिवसेनेचे उपतालुका प्रमुख अशोक थोरवे यांच्या पुढाकाराने व केळवणे युवासेना विभाग अधिकारी स्वप्नील भोवड,ग्रुप ग्रामपंचायत आपटा उपसरपंच वृषभ धुमाळ , सदस्य मारुती चव्हाण , रायगड जिल्हा कायाध्यक्ष गणेश थोरवे ,रोहन भोईर , कुणाल थोरवे ,ओमकार पवार ,कृष्णा सोडे , अशोक काटे , गोविंद किलंजे , कैलास आभाले या सामाजिक कार्यकर्त्याच्यासह कार्याने आज १८ ते २० गावातील आशा सेविकांना धान्य वाटप करण्यात आले.

तांदूळ ,डाळ , मसाला , गव्हाचे पिठ इत्यादी वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रत्येकी १० कि.लो सामान देण्यात आलं .आशा गट प्रवर्तक जोस्त्ना मिलिंद देशमुख , गट प्रवर्तक दिपाली कैलास पाटील ,गट प्रवर्तक अस्मिता अशोक कोंडीलकर यांच्यासह ५४ आशा सेविकांना मदतीचा हात देण्यात आला .
यावेळी आशा गट प्रवर्तक जोस्त्ना देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले.

२००९ पासून आशा सेविका ह्या समाजासाठी कार्यरत आहेत.पण मानधन कमी असल्याने त्यांची अहवेलना होत असते , कमी मानधन असल्याने कुटुंबाच पालन पोषण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते ही खंत सर्व आशा सेविकांनी व्यक्त केली व शासन दरबारी याची दखल घेतली जाईल अशी आशा व्यक्त केली .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.