Press "Enter" to skip to content

एम.पॉवर तर्फे ढोकळेवाडी गावाला गृहोपयोगी वस्तूंचे वाटप

सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

गेल्या वर्षापासून कोरोना विषाणूच्या महामारीमुळे सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आला तसेच चक्रीवादळ आणि विविध रोगांचा होणारा फैलाव यामुळे सामान्य जनतेला जिवन जगणे मुश्किल होत आहे. हाताला काम नाही त्यामुळे पैसा नाही अशा अवस्थेमध्ये कुटुंब चालवायचे कसे असा मोठा गंभीर प्रश्न अनेकांना पडला आहे. या सर्व गोष्टींची दखल घेत एम पॉवर ने ढोकळेवाडी येथील ग्रामस्थांना गहु, साखर,डाळीचे अशा विविध जीवनावश्यक वस्तूचे वाटप करुन सहकार्य केले आहे.

एम.पॉवर चे मालक श्री कर्नल कोहली तसेच अनिल भसीन यांच्या हस्ते ढोकळेवाडी येथील कुटुंबांना या जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले असुन यावेळी एम.पॉवरचे मॅनेजर श्री. देसाई उपस्थित होते. एम.पॉवरच्या यां सहकार्याच्या उपक्रमाचे ग्रामस्थांनी आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.