Press "Enter" to skip to content

नागोठण्यातील आग लागलेल्या ठिकाणी नाना पटोलेंकडून पाहणी

सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।

कोकणासह रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टी पासून जवळील गावांना
नुकत्याच येऊन गेलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा बसलेला जोरदार तडाखा आणि यामध्ये झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोंकण दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानासाहेब पटोले शनिवारी सकाळी रायगडला भेट दिली.

यावेळी त्यांनी अलिबाग व पेणचा दौरा आटपून महाडला जात असताना नागोठण्यातील गोळे कुुुुटूंबियांच्या इमारतीत भाड्याने असलेल्या साईलक्ष्मी स्वीट मार्टच्या दुकानासह बाजूच्या ८ दुकानांना भीषण आग लागून झालेल्या नुकसानीची पाहणी केली व नुकसान झालेल्या सर्व दुकानदारांशी व जागामालकांशी चर्चा करून त्यांना धीर दिला. तसेच शासनाच्या वतीने जी काही जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचे आश्वासन नाना साहेब पटोले यांनी यावेळी सर्व दुकानदारांना व जागा मालकांना दिले.

यावेळी त्यांच्या समवेत खासदार हुसेन दलवाई, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माणिक जगताप, रायगड जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्षा श्रद्धा ठाकूर, कोकण प्रदेश समन्वयक नंदा म्हात्रे, युवक अध्यक्ष प्रथमेश पाटील, हेमराज म्हात्रे, रोहा पं. स. सदस्य बिलाल कुरेशी, नागोठणे शहर अध्यक्ष अशपाक पानसरे, काँग्रेस युवा नेते सद्दाम फरमान दफेदार, विनोद अंबाडे, आर .जे .म्हात्रे, सर्फराज हाफिज, रमीझ दफेदार, फझल दफेदार, आदिल पानसरे, फाहद गजगे आदींसह नागोठणे शहर व विभागातील काँग्रेसचे कार्यकर्ते व नागोठणे शहरातील व्यापारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.