सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
कोरोना संक्रमण व प्रादूर्भाव रोखण्यासाठी रोहे तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी ग्रा.पंचायतीचे वतीने नागरिकांचे शारीरिक तापमान व आँक्सिजन पातळी तपासणी मोहिम यशस्वीरीत्या संपन्न करण्यात आली.
या मोहिमेतंर्गत ग्रा.पं.हद्दीतील तळवली तर्फे अष्टमी, चिल्हे व आदीवासी वाड्यांवरील नागरिकांचे शारिरीक तापमान व आँक्सिजन पातळी तपासून कोरोना प्रादुर्भाव व संक्रमण रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण मोहिम राबविण्यात आली.यावेळी सरपंच रूपाली कोस्तेकर, उपसरपंच मानसी लोखंडे, पो.पाटील खेळू मरवडे, गणेश महाडिक, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रविंद्र मरवडे, यांच्याबरोबर येथील प्रा.शाळेतील शिक्षक,अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनिस, ग्रा.पंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.या मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला.तर कोरोनाचे लसिकरण लवकरात लवकर करून घेण्याचे तसेच कोरोना काळात शासकीय नियमावलीचे पालन करून तसेच प्रत्येकाने अधिकाधिक खबरदारी घेऊन आपले कुटुंब सुरक्षित कसे राहिल यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन ग्रा.पंचायतीचे वतीने करण्यात आले.








Be First to Comment