Press "Enter" to skip to content

केंद्र सरकारच्या विरुद्ध नेरळ शहर राष्ट्रवादी काँगेसच्या वतीने निषेध

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात कर्जत तालुक्यातील नेरळ शहर राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या वतीने निषेध करून रस्त्यावर निदर्शने करण्यात आली.

नेरळ येथील अंबिका भुवन नाका येथे निषेध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एकीकडे कोरोनाचे संकट तर येवून गेलेल्या तोक्ते चक्रीवादळाने सामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच इंधन दर वाढीमुळे जीवनावश्यक वस्तूचे दर वाढल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे, केंद्र सरकारने गुजरात ला एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली, मात्र महाराष्ट्राला या पासून दूर ठेवले आहे, म्हणूनच राष्ट्रवादी रायगड जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ शहरात मोदी सरकार विरोधात निषेध नोंदवण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादीचे कर्जत तालुका उपाध्यक्ष भगवान चंचे, महिला तालुका अध्यक्ष ॲड. रंजना धुळे, नेरळ शहर अध्यक्ष निकेश म्हसे, रायगड जिल्हा युवक उपाध्यक्ष नोमान नजे, नेरळ शहर युवक अध्यक्ष अतुल चंचे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते धनाजी गरुड, जाबिर नजे, रेणुका चंचे, प्रीतम गोरी, रोहन चव्हाण, आत्माराम धुळे,नागेश कराळे, अक्षय चंचे, अविनाश चंचे, दर्शन चंचे आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.