Press "Enter" to skip to content

जि प सदस्या पद्माताई पाटील यांचे खासदार सुनिल तटकरेंना निवेदन

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लोधिवली अंबानी हाॅस्पिटलात लस सुरू करण्याची मागणी

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

माजी उपसरपंच सुरेश पाटील यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या पद्माताईं पाटील यांनी परिसरातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी एक स्वतंत्र लस केंद्र उपलब्ध झाल्यास परिसरातील इतर चार लस केंद्रांवर गर्दी होणार नाही यावर लक्ष देवून सध्या तरुणाईला लसीची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करत खासदार सुनिल तटकरे यांना रसायनी पाताळगंगा परिसराकरिता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लोधिवली अंबानी हाॅस्पिटलात लस सुरू करण्याची मागणी केली आहे.

मोहोपाडा,रिस,लोधिवली,वाशिवली यातील लोधिवली येथील लस केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठीच केल्यास इतर तीन लस केंद्रात गर्दी होणार नाही अशी नागरिकांचे म्हणणे आहे. याकरिता जि.प.सदस्या पद्माताई सुरेश पाटील यांच्या मार्फत पत्राद्वारे रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांना रोहा सुतारवाडी येथे भेट घेऊन निवेदन देऊन मागणी केली आहे.

शासनाने प्रथमतः ४५ च्या पुढील वयोगटातील नागरिकांना लस देण्यास चालू केले होते.या वयोगटातील नागरिकांना लस देऊन होण्याच्या अगोदरच शासनाने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी लस घेण्यासाठी फरमाण काढल्याने राज्यात मोठी द्वीधा परिस्थिती निर्माण झालेली आहे.सध्या स्थितीत ४५ च्या पुढील असंख्य नागरिकांनी अध्याप लस घेतलेली नाही.आणि आता १८ च्या पुढील नागरिकांसाठी लस सूरु करण्यात आली आहे.

पाताळगंगा परिसरात लोकसंख्या पाहता लोधिवली ,रिस,मोहोपाडा,वाशिवली येथे लस केंद्र आहेत.परिसरातील नागरिकांची लोकसंख्या पाहता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लोधिवली येथील धिरुभाई अंबानी रुग्नालयात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी स्वतंत्र लस केंद्र म्हणून आदेश व्हावेत या मागणीचे पत्र खासदार सुनिलजी तटकरे यांना रोहा सुतारवाडी येथे निवेदन देऊन मागणी केली आहे. यावेळी माजी उपसरपंच सुरेश पाटील सोबत ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार पाटील, हरेश पाटील उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.