नागोठण्यातील आग नुकसानग्रस्त तीन व्यावसायिकांना भाजपा कडून तातडीची आर्थिक मदत
सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।
नागोठणे एसटी स्टॅन्ड समोरील गोळे कुटूंबियांच्या सामाईक इमारतीत असणाऱ्या दुकानांना लागलेल्या भीषण आगीत दोन सलून दुकानदार व एक घड्याळ रिपेरिंग दुकानदार या छोट्या व्यावसायिकांचेही नुकसान झाले होते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आ. रवीशेठ पाटील यांनी घटनास्थळी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती आणि सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते.
याच पार्श्वभूमीवर आ.रवीशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा रोहा तालुका संपर्क प्रमुख राजेश मपारा यांच्या संकल्पनेतून आगीतील नुकसान झालेल्या नागोठणे येथील दोन सलून दुुुकानदार व एक घड्याळ रिपेरिंग दुकानदार यांना प्राथमिक आधार मिळावा या भावनिक हेेेेतूने व त्यांनी आपला व्यवसाय पुन्हा सुरू करावा यासाठी प्रत्येेेकी पाच हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत शनिवार दि.२२ मे रोजी सायंकाळी सुपूर्द करण्यात आली.
यावेळी उपस्थित भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा म्हणाले की, गुरुवारी लागलेल्या या भीषण आगीत अनेक दुकानांचे अतोनात नुकसान झालेले आहेे. यासंदर्भात स्थानिक आ.रवीशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली यांचे आम्ही अवलोकन केले असता या आगीमध्ये अतिशय छोटे छोटे दुकानदार उध्वस्त झाल्याचे दिसून आले.आधीच सुरू असलेले लॉकडाऊन यानंंतर या छोट्या दुकानदारांवर आलेल्या आगीच्या या मोठ्या प्रसंगातून यांना सावरण्याचा एक छोटाशा प्रयत्न आम्ही सर्व भाजपा परिवारातील सदस्य करत आहोत.
आ. रवीशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठण्यातील या छोट्या दुकानदारांना आधार द्यावा या हेतूने मदत केली आहे. शासन दरबारी आम्ही आ.रवीशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली नुकसानग्रस्त दुकानदारांना देण्यात देण्यासाठी प्रयत्नशील आहोतच परंतु छोट्या दुकानदारांना आपला व्यवसाय उभारण्यासाठी आम्ही ही छोटीशी मदत करीत आहोत. यात प्रामुख्यानेे या लॉकडाऊनच्या काळात सर्वात जास्त आर्थिक तोटा होत असलेेल्या नाभिक समाजातील दोन सलून दुकानदार व एक घड्याळ रिपेरिंग दुकानदार यांना आम्ही मदत केली आहे.
या दुकानदारांनी आमची छोटीशी मदत स्वीकारली यासाठी त्यांना धन्यवाद देत असतानाच या दुकानदारांना आपल्या काही अडचणी आल्यास त्या दूर करण्यास आम्ही प्रयत्नशील राहू असेेेेही शेवटी राजेश मपारा यांनी सांगितले.
भाजपा महिला मोर्चाच्या नागोठणे विभाग अध्यक्षा श्रेया कुंटे यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या या छोटेखानी या कार्यक्रमाला भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा रोहा तालुका संपर्कप्रमुख राजेश मपारा, महिला आघाडी रायगड जिल्हा चिटणीस वैशाली मपारा, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, सचिन मोदी, आनंद लाड, शैलेश रावकर, विठोबा माळी, विवेक रावकर, रऊफ कडवेकर, तिरथराव पोलिसानी, सिराज पानसरे, श्रेया कुंटे, नीलिमा राजे, अपर्णा सुटे, माधुरी रावकर, अशोक अहिरे व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment