रहिवाशांना मिळाला पहिला डोस
तब्बल 900 नागरिकांचे झाले लसीकरण
सिटी बेल/ पनवेल.
कोरोना विषाणू ची दुसरी लाट हळू हळू ओसरत आहे.म्युकर मायकोसिस चा धोका दिसू लागलाय.ऑक्सिजन, अँटी व्हायरस इंजेक्शन चा तुटवडा पडला होता.या सगळ्यात आशेचा किरण म्हणजे उपलब्ध असणारी कोरोना प्रतिबंधक लस! पनवेलच्या कल्पतरू सोसायटीने पुढाकार घेत रहिवाशांसाठी लसीकरण प्रक्रिया राबविली आहे यामध्ये तब्बल 900 रहिवाशांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला.
सोसायटीचे रहिवासी प्रशांत बाळाराम ठाकूर यांनी पुढाकार घेत लसीकरण शिबिर आयोजित केले होते. अपोलो हॉस्पिटल च्या मदतीने लसीकरण संपन्न झाले. पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांचे फार मोठे सहकार्य या लसीकरण शिबिराला लाभले. सोसायटी चे सचिव नितीन ठाकूर,पनीर सेल्वं यांनी देखील लसीकरण शिबिरासाठी अथक परिश्रम घेतले. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अनिल भगत आणि नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरण शिबिर संपन्न झाले.
18 वर्षावरील सर्व नागरिकांना लस टोचण्यात आल्यामुळे रहिवाशांनी आयोजकांचे आभार मानले. कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा सामना करायचा असेल तर लसीकरण हा एकमेव मार्ग आपल्या हातात आहे. त्यामुळे सगळ्यांनी लस घेतलीच पाहिजे असा संदेश आयोजकांच्या वतीने यावेळी देण्यात आला. पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये अशाप्रकारे पूर्णच्या पूर्ण सोसायटी लसीकरण करण्याचां पहिला सन्मान कल्पतरू सोसायटीने पटकावला असून नवी मुंबई सह रायगड क्षेत्रात त्यांचा दुसरा क्रमांक लागतो.
या शिबिरात संक्रमण होऊ नये यासाठी सामाजिक अंतर राखण्याचे सारे निकष काटेकोर पणे पाळण्यात आले होते.









Be First to Comment