Press "Enter" to skip to content

नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याचे आदेश

नागोठण्यातील आग लागलेल्या ठिकाणी पालकमंत्री आदितीताई तटकरे यांची भेट

सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।

नागोठणे एसटी स्थानका समोर असलेल्या गोळे कुटुंबियांच्या जुन्या इमारतीला गुरूवारी (दि.२०) मध्य रात्री भीषण आग लागली होती. ही आग एवढी भडकली होती की, या इमारती मधील भाडेकरू असलेल्या रायका बंधू यांच्या साई लक्ष्मी स्वीट अँड फरसान मार्ट या मुख्य दुकानासह ६ अन्य दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडली होती. तर इतर ३ दुकानांनाचेही या आगीमुळे थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे या आगीत नुकसान झाल्याचा आकडा एकत्रितपणे सुमारे ७० लाखांपर्यंत पोचला होता.

या आगीची माहिती मिळताच रायगडच्या पालकमंत्री ना. कु.आदितीताई तटकरे यांनीही शुक्रवार दि. २१ मे रोजी सायंकाळी आपल्या व्यस्त दौ-यातून तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी दुकानाचे मालक व भाडेकरू यांच्या सोबत चर्चा करून तलाठी व महसूल प्रशासनाला या घटनेचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी उपस्थित असलेले रोहाचे प्रांताधिकारी डाॅ. यशवंतराव माने यांनाही ना. आदितीताई तटकरे यांना नुकसानभरपाई संदर्भात आवश्यक त्या सुचना केल्या. तसेच नुकसान ग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळून देण्याचे आश्वासन यावेळी ना. आदितीताईंनी दिले. यावेळी राष्ट्वादीचे जेष्ठ नेते भाई टके, विलास गोळेे, नागोठणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विलास चौलकर, रोहाचे प्रांताधिकारी डााॅ. यशवंतराव माने, रोहाचे पोलिस उपाधिक्षक किरणकुमार सुर्यवंशी आदींसह गोळे कुटुुंबीय तसेेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे शहर व विभागातील कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.