वाशिवली येथे पेवर ब्लॉक रस्त्याच्या कामाचा सरपंच गौरी गडगे यांच्या हस्ते शुभारंभ !
सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
रायगड जिल्ह्यात उत्पादनात दुसऱ्या क्रमांक लागत असलेली श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून वडगाव ग्रामपंचायत अशी जिल्ह्यात ओळख आहे.या ग्रुप ग्रामपंचायत वडगांव सरपंच गौरी गडगे व सहकारी सदस्य यांची विभागात विकासकामांची धडाकेबाज कामगिरी सुरू असून विकासकामांमुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.
काही दिवसापुर्वीच मौजे वाशिवली येथे सोमनाथ जाधव ते रघुनाथ शिवले यांचे घरापर्यत गटार दुरूस्ती करणे या कामाचे भुमिपूजन ग्रुप ग्रामपंचायत वडगांवच्या विद्यमान सरपंच गौरी महादेव गडगे यांच्याहस्ते करण्यात आले होते.
तर ग्रुप ग्रामपंचायत वडगांव हद्दीतील मौजे वाशिवली येथील गोकूळ आळीतील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ग्रामपंचायतीने मार्गी लावला आहे.
सदर ठिकाणच्या ग्रामस्थांना बऱ्याच वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवत होता ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून सदर गोकूळ आळीमध्ये नवीन पाईप लाईन टाकणेत आली असून सदर ठिकाणी पाण्याचा पुरवठा सुरळीत केला आहे.ग्रामपंचायत हद्दित विविध विकास कामे मार्गी लागत असल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे.नुकताच वाशिवली येथे पेवर ब्लॉक रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सरपंच सौ. गौरी महादेव गडगे यांच्या हस्ते होऊन कामास सुरूवात करण्यात आली. वाशिवली प्रभागातील मुख्य रस्ता ते दशरथ पाटील यांच्या चाळीपर्यंत पेवर ब्लॉक रस्ता काही दिवसातच नागरिकांच्या सेवेसाठी तयार होणार आहे.
या रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी सरपंच सौ.गौरी गडगे ग्रामपंचायत सदस्य वर्षा पाटील, शिवाजी शिंदे, राजेश पाटील, महादेव गडगे, संदेश मालकर आदी ग्रामपंचायत सदस्य तसेच संतोष पाटील, मदन ठोंबरे, दामू पवार, दशरथ पाटील, संदीप शिंदे, राजेश सदाशिव पाटील, नारायण झिंगे, पंकज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment