सिटी बेल । पेण । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी आपल्या मुलीच्या विवाहानिमित्त पेण तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी 1 लाख रुपयांचा धनादेश पेण तहसिल कार्यालयाचे वडखळ मंडळ अधिकारी डी.एस.साळुंखे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पेण तालुक्यातही दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्याने एक सामाजिक बांधिलकी जोपासत संजय जांभळे यांनी आपली कन्या कृतिका हिच्या शुभविवाह निमित्ताने दिनांक 20 मे 2021 रोजी वडखळ येथे पार पडला यावेळी वधूवरांना आर्शिवाद देण्यासाठी पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील, महाड आमदार भरत गोगावले, अलिबाग आमदार महेंद्र दळवी, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आदि मान्यवरांच्या उपस्थित कोरोना रुग्णांसाठी 1 लाखांचा धनादेश देण्यात आला. यावेळी संजय जांभळे यांच्या या सामाजिक कार्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.








Be First to Comment