सिटी बेल । खांब-रोहा । नंदकुमार मरवडे ।
रोहा तालुक्यातील प्रतिष्टीत समजल्या जाणा-या ग्रु. ग्रा.पं. मेढा या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी सरपंच स्नेहा महेंद्र खैरे यांच्या अध्यक्षखाली उपसरपंच पदाची निवडणुक घेण्यात आली.यामध्ये उपसरपंच पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उदय दत्तात्रेय मोरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीच्या सर्व प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर उदय मोरे यांचा अर्ज वैध ठरवून त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणुक अधिकारी तथा सरपंच स्नेहा खैरे यांनी केली.
या झालेल्या निवडणुक प्रक्रियेत सरपंच स्नेहा खैरे मावळते उपसरपंच नम्रता सुतार, सदस्य उदय मोरे, सदस्य रविंद्र जाधव, सदस्य जगदिश घरट, सदस्या, श्रेजल उंबरे, सदस्या, नम्रता महाले, सदस्या ज्ञानेश्वरी गोवर्धने, सदस्या समिक्षा जवके सदस्या, शेवंती शिद यांनी सहभाग घेऊन उपस्थिती दर्शवली. मावळते उपसरपंच नम्रता सुतार यांनी आपला उपसरपंच पदाचा कार्यकार पुर्ण केल्याने त्यांनी राजीनामा दिल्याने सदर उपसरपंच पदाची निवडणुक घेण्यात आली.
उपसरपंच पदी उदय मोरे यांची निवड झाल्यानंतर सरपंच स्नेहा खैरे, मावळते उपसरपंच नम्रता सुतार व उपस्थित सदस्यांनी यांना सन्मानी उपसरपंच पदाच्या आसनात बसविले व त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले दरम्यान रोहा पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मण महाले, ग्रामसेवक अमोल तांबडे यांनी उपसरपंच उदय मोरे यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार व अभिनंदन केले. तसेच उपसरपंच उदय मोरे यांचे खासदार सुनिलजी तटकरे, पालकमंत्री आदितीताई तटकरे, आमदार अनिकेतभाई तटकरे, जेष्ट नेते भाईसाहेब पाशिलकर, जिल्हा कार्यअध्यक्ष मधुकर पाटील, सदस्य सरचिटनिस विजय मोरे, नगरअध्यक्ष संतोष पोटफोडे, जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष समिर सकपाल सभापती गुलाब वाघमारे, माजी सभापती राजेश्री पोकळे, माजी जि.प सदस्य नंदु म्हात्रे, रोहा तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष विनोद पाशिलकर, तालुका युवक अध्यक्ष महेंद्र खैरे, माजी.तालुका कॉग्रेस अध्यक्ष लिलाधर थोरवे अनेक मान्यवरानी निवडीबाबत समाधान व्यक्त करुन अभिनंदन केले आहे.
या उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी मेढा हायस्कुल चेअरमेन, भगवान गोवर्धने, मेढा ग्रा.पं. तंटामुक्त अध्यक्ष विलास खांडेकर, माजी सरपंच, विलास उंबरे, माजी सरपंच, संतोष सुतार, माजी सरपंच, ज्ञानदेव शेलार, विजय मोरे, नथुराम महाले, जितेंद्र जाधव, चंद्रकांत गोवर्धने, संतोष जवके, सुभाष भिसेकर, राजेंद्र घरट महादेव खरपुडे नरेश शिद, प्रतिक वजले, भगवान जाधव, , भिसे ग्रा.पं. तंटामुक्त अध्यक्ष हरिश्चंद्र ठमके, छगन सुरेश लाड, रागिणी गोवर्धने, विद्यार्थी सघंटनेचे शुभम उंबरे, धोंडुराम जाधव आदिमान्यवर उपस्थित होते. निवडणुक बिनविरोध व शांतेत पार पाडल्याने ग्रामसेवक तांबडे यांनी सर्वांचे आभार मानले.








Be First to Comment