Press "Enter" to skip to content

रोहा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयास क्लॅरिअंटकडून मल्टीपल पॅरामीटर मॉनिटर उपकरण प्रदान

सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

रोहा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या दैनंदिन शारीरिक बदलांच्या नोंदी ठेवण्यासाठी कोणतेही अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध नसल्यामुळे आधीच मनुष्यबळ कमी असताना रुग्णांचे रक्तदाब,ऑक्सिजन पातळी, हृदयाचे ठोके हे वारंवार तपासणे परिचारिकांच्या साठी त्रासदायक तसेच डोकेदुखी ठरत होते.

रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. अंकिता खैरकर यांनी रुग्णसेवेत आपल्याला भेडसावणारी ही समस्या क्लॅरिअंट व्यवस्थापना समोर व्यक्त केली होती. त्यावर तातडीने निर्णय घेत क्लॅरिअंटचे साईड हेड अभिजीत दोशी व प्रशासन प्रमुख उदयन बडकस यांनी सामाजिक बांधिलकी जपत ही पॅरामीटर माॅनिटर उपकरणे उपलब्ध करून दिली. गुरुवार २० मे रोजी रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. अंकिता खैरकर यांचेसह क्लॅरिअंट वैद्यकीय अधिकारी डॉ.मिनल वागळे,पर्यावरण व सुरक्षा विभागाचे डॉ. शैलेश नकाते, पराग फुकणे, सुनिल दळवी,मुख्य परिचारिका बुधे, शेवडे यांचे उपस्थितीत तीन उपकरणांचे संच रुग्णालयास सुपूर्द करण्यात आली.

रोहा शहर व परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातील बहुतांश रुग्ण उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत असतात.यासर्व रुग्णांवर उपचार करण्याबरोबरच त्यांच्या वर पूर्ण वेळ लक्ष द्यावे लागते. यात त्यांचे ब्लड प्रेशर, पल्स व ऑक्सिजन पातळी यावर सतत काटेकोरपणे लक्ष द्यावे लागते. यासाठी संबंधित डाॅक्टर व परिचारिका यांना त्या रूग्णांच्या संपर्कात यावे लागते. तसेच कायम लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ अपुरे पडते.रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिका यांना भेडसावणाऱ्या या समस्येची दखल क्लॅरिअंट प्रशासनाने घेतली. आपल्या सामाजिक दाईत्व निधीतून एक लाख दहा हजार रुपयांचे तीन पॅरा मॉनिटर संच आज रुग्णालयास उपलब्ध करून दिले.यामुळे गंभीर प्रकृती असणाऱ्या रुग्णांच्या शारीरिक बदलांच्या सर्व नोंदी ठेवणे आता परिचारिकांना सोयीस्कर ठरेल व त्या रुग्णासही उपचार घेण्यास फायदेशीर ठरेल. ही प्रणाली उपलब्ध करून दिल्याबद्दल क्लॅरिअंट प्रशासनाचे रुग्णालयातील कर्मचारी व रुग्णांच्या नातेवाईकां कडून याबत कौतुक होत आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.