Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषद क्षेत्रामधील गटार कामाची मुख्याधिकारी यांच्याकडून पाहणी

सिटी बेल । कर्जत । गायकवाड ।

कर्जत नगरपरिषद क्षेत्रात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत निधीतून बांधण्यात आलेल्या गटार कामाची पाहणी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी केली.

कर्जत मधील सुरभी ज्वेलर्स ते हॅप्पी होम पर्यत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत निधीतून सुमारे 68 लाख 79 हजार 858 रुपये खर्च करून 300 मीटर लांबीचे गटार बांधण्यात आले आहे. या कामाचा ठेका मीराताई एंटरप्राइजेस तर्फे भूषण भोइर यांनी घेतला होता.

पूर्ण झालेल्या या कामाची पाहणी नगर कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगर परिषदेचे नगर अभियंता मनीष गायकवाड, आरोग्य विभागाचे सुदाम म्हसे यांनी केली. यावेळी ठेकेदार भूषण भोईर उपस्थित होते. या गटाराचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी झाल्याने या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.