कोरोनाकाळात सार्वजनिक आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी सुदर्शन केमिकल कंपनीचा पुढाकार
सिटी बेल । धाटाव । शशिकांत मोरे ।
जागतिक रंगद्रव्ये उत्पादनात अग्रेसर असणारी धाटाव येथील सुदर्शन केमीकल इंडस्ट्रीज ही कंपनी सामाजिक कार्याने नेहमीच अग्रेसर राहीलेली आहे.शिक्षण, पर्यावरण,आणि सामाजिक विकास साधण्यासाठी ‘सुदर्शन’ आजवर कटीबद्ध राहिली आहे.याचाच भाग म्हणून सुदर्शन सीएसआर फाऊंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजू लोकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर,रक्तदान शिबिर, गरजुना उपचारासाठी मदत,कोरोना काळात निर्जंतुकिकरण फवारणी,गरजु कुटुंबांना धान्य
वाटप त्याचप्रमाणे जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
रोहा तालुक्यातील दुर्गम भागामध्ये सार्वजनिक आरोग्य यंत्रणा
जीवनदायीनी ठरत आहे.आजही येथील गोरगरीब जनता वैद्यकीय उपचारासाठी सार्वजनक आरोग्य यंत्रणेवरच अवलंबून
आहे. रोह्याच्या आदिवासी वाड्या वस्त्यांवरील गरजू रुग्णांना तात्काळ वैद्यकीय मदतीसाठी आंबेवाडी प्राथतिक आरोग्य केंद्र, रोहा उपजील्हा रुग्णालय हाच एकमेव पर्याय उपलब्ध असतो.
या ठीकाणी गरजु लोकांना चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध होणेसाठी ‘सुदर्शन’कडू न वेगवेगळ्या स्वरुपात मदत पुरतवण्यात येत आहे.
त्याच अनुषंगाने कोरोना काळात मदतीचा हात देताना सुदर्शन कंपनीने आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शस्त्रक्रिया विभागासाठी एसी मशीन व वाशिंग मशीन,रोहा उपजिल्हा रुग्णालयात तीन HFNO मशीन तर एक वाशिग मशीन व १०० पिपीई किट,कोकबन लसीकरण केंद्रासाठी खुर्च्या अशा स्वरूपात मदतीचा हात पुन्हा एकदा पुढे केला आहे.
सुदर्शन कडून देण्यात आलेल्या अत्याधुनीक HFNO मशीन मुळे कोवीड रुग्णांना अत्यावश्यक प्राणवायु देण्यास खुप मदत होत आहे.यापुढेही रुग्णालयातील आरोग्य सुवीधा सक्षिमीकरणासाठी सुदर्शनचे सहकार्य मीळावे अशी अपेक्षा रोहा उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.अंकीता खैरकर यांनी व्यक्त केली.तर सुदर्शंनच्या सी.एस.आर.फाऊंडेशनने ओपरेशन थिएटर साठी उपलब्ध करून दिलेल्या एसी मुळे कुटुंब कल्याण सारख्या शस्त्रक्रिया करण्यास मदत होणार आहे असे आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा चौहान यांनी सांगितले.
दरम्यान या वाटप प्रसंगी सुदर्शन केमिकलचे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट विवेक गर्ग,सी.एस आर हेड माधुरी सनस,एक्झीटीव रुपेश बारमते,विशाल घोरपडे,रवी दिघे यांच्यासह डॉ.अंकिता खैरकर,कृष्णा चव्हाण यांसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.








Be First to Comment