देवा ग्रूप फाउंडेशनच्या वतीने रोहा,धाटाव,कोलाड पोलीस ठाण्यात मास्क आणि स्यनिटायजर वाटप
सिटी बेल । धाटाव । शशिकांत मोरे ।
रोहा तालुक्यातील देवा ग्रूप फाउंडेशनच्या ही शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असून अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे.आपल्या विधायक कार्याची सुरुवात या संघटनेच्या माध्यमातून करताना त्यांनी रोहा,धाटाव,कोलाड पोलीस ठाण्यात मास्क आणि स्यनिटायजर वाटप करून केली आहे.


या संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बॉबीशेठ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तर रोहा तालुका अध्यक्ष विकी रामाने,उपाध्यक्ष समीर रटाटे यांच्या देखरेखीखाली हा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमाने रोह्यात विधायक कामासाठी संघटनेने उत्तम सुरुवात केली आहे.


दरम्यान रोहा,धाटाव,कोलाड पोलीस ठाण्यात तेथील प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते मास्क आणि स्यनिटायजर सुफुर्द करण्यात आले.या सर्व वस्तू येथील कर्मचारी वर्गाला फायदेशीर ठरणार आहेत.








Be First to Comment