Press "Enter" to skip to content

युवा कवयित्री वर्षा शिदोरे लिखित ‘स्मितरहस्य’ काव्यसंग्रहास पुरस्कार

सिटी बेल । रोहा-रायगड । नंदकुमार मरवडे ।

साहित्य क्षेत्रात आपली एक आगळी वेळगी ओळख निर्माण करणाऱ्या नाशिक येथील युवा कवयित्री वर्षा शिदोरे यांचा ‘स्मितरहस्य’ हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे.त्यांच्या या काव्यसंग्रहास
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील साहित्यिक व वाचक वर्गांनी हा काव्यसंग्रह वाचून त्याचे छानसे अभिप्रायही पाठविले आहेत.
नुकताच या काव्यसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व्यक्त होताना दिसत आहे.कवी चंद्रकांत जोगदंड यांच्या काव्यार्चना कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त कै गंगाधर श्रावण आबक यांच्या स्मरणार्थ त्यांच्या ‘स्मितरहस्य’ काव्यसंग्रहास विशेष सन्मान देण्यात आला असून सन्मान पत्र व स्मृतिचिन्ह हे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुढील काही महिन्यांत एका कार्यक्रमदरम्यान मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे प्रदान करण्यात येईल अशी माहिती कवी चंद्रकांत जोगदंड यांनी दिली आहे.

कवयित्री कु. वर्षा बाबासाहेब शिदोरे या उंटवाडी, नाशिक येथील असून वर्तमानपत्रे, इंस्टाग्राम, फेसबुक, ब्लॉग, स्टोरी मिरर तसेच इतर समाजमाध्यमांवर त्यांचे लेखन (लेख, कथा, कविता इत्यादी) प्रदर्शित आहे. वयाच्या २४ व्या वर्षी लिहिलेला पहिला कविता संग्रह ‘स्मितरहस्य’ २८ सप्टेंबर २०१९ मध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.