तुमच्या घरातील “या” वस्तु वाढवतात दारिद्र्य ! या वस्तू आपल्या घरात तर नाहीत ना ?
घर म्हणजे आपली वास्तू चुकीच्या पद्धतीने बांधल्यास आपल्या घऱात आयुष्यभर संकटे येत असतात. घरात सुख- शांती, उत्तम आरोग्य हवे असल्यास घराची मांडणी आणि बांधणी हे खूप महत्त्वाचे असते. घराचे बांधकाम करताना अनेकजण वास्तुविशारदाचा सल्ला घेत असतात. परंतु त्यानंतर काही चुका घरात राहणाऱ्या व्यक्तींकडून होत असल्याने वास्तू व्यवस्थित राहूनही शांती आणि स्वास्थ लाभत नाही. त्यामुळे घरात राहणारे व्यक्ती सुखी राहत नाहीत. घरात नेहमी नकारात्मक ऊर्जा, आजारपण, गरिबी, नुकसान, अपयश येत असते. घरातील कोणत्याच कार्याला यश येत नाही. यामुळे घरात दुख आणणारे, नकारात्मकता आणणाऱ्या गोष्टी कोणत्या याविषयी जाणून घेऊ.
तुमच्याही घरात अशा वस्तू नाहीत ना याची माहिती करून घ्या.

तुटलेल्या ताटामुळे वाढतं कर्ज
वास्तुविशारदाच्या मते. घऱात तुटलेले ताट असणं खूप नुकसानकारक असते. घरात कोणतीच वस्तू तुटलेली नसावी. कधीच तुटलेली किंवा तडा गेलेले ताट नसावे. अशा तुटलेल्या ताटातून जेवण केल्यास किंवा दुसऱ्याला दिल्यास घरातील सदस्यांवर कर्जाचे संकट येत असते. शिवाय घरात कोणते ना कोणते आर्थिक समस्या येत असतात.

तुटलेला पंलगामुळे घरातील समस्या वाढते
जर घरात कोणता तुटलेला पंलग असेल किंवा खाट असेल तर तुमच्या समस्या नेहमी वाढत असतात. वास्तुविशारदाच्या मते, घरात कधीच तुटलेला बेड म्हणजेच पंलग राहू देऊ नये. याशिवाय घरातील दक्षिण बाजूच्या भिंतीवर आरसा लावू नये. यामुळे घरातील महिला सुखी राहत नाहीत. शक्य असेल तर घराच्या उत्तरेला आठ कोन असलेला आरसा लावावा. जेणेकरुन घरात कोणतीच समस्या येत नाही.








Be First to Comment