Press "Enter" to skip to content

भय इथले संपले नाही !

तौत्के नंतर आता Yaad वादळाचा धोका ! “या” राज्यांना देण्यात आला धोक्याचा इशारा..

सिटी बेल । नवी दिल्ली ।

 महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये तौक्ते चक्रीवादळाने दाणादाण उडवलेली असतानाच आता आणखी एका चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. आता Yaas चक्रीवादळ येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने काही राज्यांमध्ये Yaas चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राज्यांना अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्याने Yaas वादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या खाडीत उत्तर मध्यावर कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे.

त्यामुळे 23 आणि 24 मे रोजी त्यांचं वादळात रुपांतर होणार आहे. हे वादळ तयार झाल्यास त्याला ‘यस’ चक्रीवादळ संबोधलं जाईल. या वादळाला ओमानने ‘यस’ हे नाव दिलं आहे. आपल्या पट्ट्यात या वादळाचे संकेत आल्यास त्यावर अधिक भाष्य करता येणार असल्याचं आयएमडीच्या सुनीता देवी यांनी सांगितलं.

ओडिशा, अंदमान, बंगालला धोका ?

23 आणि 24 मे रोजी वादळ तयार झाल्यानंतर 27 ते 29 मे दरम्यान लँडफॉलचे कारण बनेल. त्यामुळे अंदमान निकोबार बेट, ओडिशा आणि पश्चिम बंगालला या वादळाचा फटका बसणार आहे. यावेळी ताशी 140 ते 150 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असं हवामान खात्याने म्हटलं आहे.

वादळासाठी परिस्थिती अनुकूल

समुद्र सपाटीचं तापमान एसएसटी बंगालच्या खाडीहून 31 डिग्रीवर आहे. सरासरी तापमानाच्या 1-2 डिग्रीच्यावर हे तापमान आहे. अशी परिस्थिती चक्रीवादळ तयार करण्यास अनुकूल असते, असं सुनीता देवी यांनी स्पष्ट केलं आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.