पालकमंत्री आदिती तटकरेंनी गागोदे येथे चक्रीवादळात मृत्यू पावलेल्या रामा कातकरी यांच्या कुटूंबाची घेतली भेट
सिटी बेल । पेण । प्रशांत पोतदार ।
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यामध्ये गागोदे विनोबा नगर आदिवासीवाडी येथे दि १७ सोमवारी चक्रीवादलात आंब्याची फादी पडून रामा बाळू कातकरी ८० वर्षाच्या वयोवृद्धाचा मृत्यू झाला होता त्याची पत्नी सीमा कातकरी याही जखमी झाल्या होत्या याघटनेची माहिती समजताच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी तातडीने पाहणी केली असून चक्रीवादलात मृत्यू पावलेल्याची माहिती घेतली व विचारपूस करून त्याच्या जखमी झालेल्या पत्नी सीमा कातकरी याची तब्येती विषयी चौकशी करून त्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत करण्यात येईल असे यावेळी सांगितले.

पेण तालुक्यातील गागोदे येथील विनोबा नगर आदिवासी वाडीतील कुटुंबाची पाहणी करतावेळी विनोबा नगर वाडीची पाहणी करून अंगणवाडी काम लवकरच मंजूर करण्यास सांगितले तसेच विनोबा भावे वाचनालय याची पाहणी करून डिजीटल वाचनालय करणार आणि रस्त्यांचे सुध्दा लवकरात लवकर काम करणार असल्याचे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री कु आदिती तटकरे, रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे, उपविभागीय अधिकारी विभा चव्हाण, तहसीलदार अरुणा जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एन पिंपळे, गटविकास अधिकारी प्रसाद म्हात्रे ग्रामसेवक वृषाली पाटील, तालुकाध्यक्ष दयानंद भगत,तलाठी स्वप्नगंधा पाटील, मंगेश नेने जितेंद्र ठाकूर, ग्रामस्थ नितीन जेधे,रामदास पवार,जाणू पवार, समीर पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.








Be First to Comment