Press "Enter" to skip to content

भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या कोकण विभाग युवती अध्यक्षपदी सुषमा ढाकणे

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी च्या कोकण विभाग युवती संयोजक (अध्यक्ष) पदी कर्जत मधील सुषमा ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची दखल घेऊन भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील,भाजपा प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारती,भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी प्रदेश संयोजक नरेंद्र पवार, व भटके विमुक्त महिला आघाडी अध्यक्षा डॉ.उज्वला हाके यांच्या आदेशा प्रमाणे युवती अध्यक्षा भाग्यश्री ढाकणे यांनी पत्राद्वारे कर्जत येथील सुषमा ढाकणे यांची भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी च्या कोकण विभाग युवती संयोजक (अध्यक्ष) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गेली अनेक वर्षे सामाजिक, राजकीय क्षेत्रात अविरतपणे कार्यरत करत असलेल्या कामाची दखल घेऊन आणि या सेवेच्या माध्यमातून गोरगरीब जनता व समाजातील शेवटच्या घटका पर्यंत मी काम करेन तसेच भारतीय जनता पार्टी च्या भटके विमुक्त आघाडीचे संघटन वाढविण्यासाठी मी या पदाला प्रामाणिकपाणे न्याय देईल असे नियुक्ती नंतर सुषमा ढाकणे यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.